संपादकीय धोरण – Editorial Policy

Sangli Today हा सांगली जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसाठी समर्पित एक स्वतंत्र डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. आमचे उद्दिष्ट वाचकांना सत्य, विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडींची माहिती देणे आहे.

  1. अचूकता व तथ्य पडताळणी

आमच्या टीमकडून प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक बातमीची वस्तुनिष्ठता आणि विश्वासार्हता सुनिश्चित केली जाते. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी आवश्यक ते स्रोत, स्थानिक संपर्क आणि अधिकृत निवेदनांची पडताळणी केली जाते.

  1. निष्पक्षता आणि पारदर्शकता

Sangli Today कोणत्याही राजकीय पक्ष, संस्था किंवा व्यावसायिक गटाच्या प्रभावाखाली कार्य करत नाही. आम्ही निष्पक्ष आणि संतुलित बातम्या देण्याचा प्रयत्न करतो. वाचकांसमोर प्रत्येक घटनेचा दोन्ही बाजूंचा दृष्टिकोन मांडणे आमच कर्तव्य आहे.

  1. जबाबदार पत्रकारिता

आम्ही समाजहिताला प्राधान्य देत बातम्या तयार करतो. अफवा, चुकीची माहिती किंवा कोणत्याही व्यक्ती/समूहाची बदनामी होईल अशी माहिती आम्ही प्रसिद्ध करत नाही.

  1. दुरुस्ती व स्पष्टीकरण

कधीही आमच्या बातमीत चुकीची माहिती आढळल्यास, आम्ही तत्काळ दुरुस्ती (Correction) करून वाचकांना योग्य माहिती पुरवतो.

  1. स्थानिक फोकस

आमची विशेषता म्हणजे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बातम्या – सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, हवामान, कायदा व सुव्यवस्था, अपघात, नागरिक प्रश्न आणि स्थानिक पातळीवरील सर्व महत्त्वाच्या घडामोडी.

✍️ Sangli Today Desk
संपादकीय टीम Sangli Today..