सांगली : सांगलीतील पंचशीलनगर परिसरात निवडणूक प्रचाराच्या वादातून एका दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आनंदा वसंत लिगाडे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंदा लिगाडे आणि संबंधित संशयित हे एकमेकांच्या परिचयातील आहेत. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पंचशीलनगर येथे हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. प्रचाराच्या कामावरून वाद झाल्यानंतर संशयितांनी आनंदा लिगाडे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भांडण सोडविण्यासाठी आनंदा लिगाडे यांच्या पत्नी आरती लिगाडे मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता त्यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर जखमी दाम्पत्याने संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संजयनगर पोलिस सदर प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: उपवळे येथे 9 वर्षांच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला; भावामुळे बचावली.
- Gold Rate Outlook 2027: सोन थेट २ लाखांवर जाणार? सणासुदीच्या काळात दरवाढीची चर्चा; तज्ज्ञांचा मोठा अंदाज अन् पाहा आजचे सोन्याचे दर
- Pensioners Life Certificate 2026: सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक; जाणून घ्या ६ सोप्या पद्धती
- Ration Card Big Update: १ नोव्हेंबरपासून मोफत धान्य बंद होणार? पिवळे व केशरी रेशनकार्ड असणाऱ्यांसाठी शासनाचा मोठा खुलासा; २.८५ लाख शिधापत्रिकांवर कारवाई
- Diwali Faral Rate 2026: दिवाळी फराळाचे दर; चकली, लाडू ते करंजीचे किलोचे भाव काय? खरेदीपूर्वी पाहा सांगलीतील फराळाचे चालू दर
- Maharashtra Weather: ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा; विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, ‘येलो अलर्ट’ जारी
- सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे बियाणे १००% मोफत; १८ हजार मिनिकीटचे वाटप, महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन









