Jat News : जत तालुक्यात मुसळधार पाऊस; काही गावांचा संपर्क तुटला, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Jat Heavy Rain Alert 2025

Jat News Today: जत तालुक्याच्या पूर्वभागात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाची नोंद झाली असून, अनेक ओढे-नाले भरून वाहत आहेत. यामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या परिसरात पाणी पातळी वाढत असून, पूल व नाल्यांवरून वाहतूक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर न पडण्याचे आणि सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन:

  • ओढे, नाले, पुलांवरून प्रवास टाळावा.
  • शाळकरी मुले, वयोवृद्ध व महिलांची विशेष काळजी घ्यावी.
  • गरज नसल्यास घराबाहेर पडू नये.
  • प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे व त्यांचे पालन करावे.

प्रशासनाने सर्व नागरिकांना संयम बाळगून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन; भाजप आमदार पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा