सांगली टुडे वृत्तसेवा: राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाकडून ५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली असली, तरी दुसरीकडे हक्काच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चे हप्ते अडकल्याने बळीराजा संभ्रमात पडला आहे. या योजनेचे प्रत्येकी २ हजार रुपयांचे दोन हप्ते म्हणजेच ४ हजार रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे दुष्काळी मदतीसोबतच आमचे थकीत असलेले नमो शेतकरीचे हप्ते शासनाने तत्काळ वितरित करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी का?
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे हप्ते वेळेत आणि नियमितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. मात्र, राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे वेळेवर न मिळाल्याने ग्रामीण भागात नाराजी पाहायला मिळत आहे.
दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यातच खरीप पिकांची काढणी आणि रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची तातडीची गरज आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ नव्या घोषणा न करता प्रलंबित असलेले हप्ते तत्काळ खात्यात वर्ग करावेत, असा सूर शेतकरी संघटनांकडून लावला जात आहे.
हप्ते कधी जमा होणार?
सध्या शासनाकडून हे रखडलेले दोन्ही हप्ते नेमके कोणत्या तारखेला खात्यात जमा केले जातील, याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. प्रशासकीय पातळीवर निधी मंजुरी आणि तांत्रिक पडताळणीचे काम सुरू असल्याची चर्चा असली, तरी जोपर्यंत कृषी विभागाकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना हप्त्याची वाट पाहावी लागणार आहे.
हे ही वाचा: पशुधन योजनेतून शेड बांधण्यासाठी खरंच ८ लाख रुपये मिळणार? सोशल मीडियावरील जाहिरातींवर शासनाचा खुलासा; पाहा सत्य.
नमो शेतकरी योजना, शेतकरी अनुदान आणि शासकीय योजनांचे अधिकृत अपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र अपडेट्स’ व्हॉट्सॲप चॅनेल नक्की फॉलो करा. 👉 चॅनेल फॉलो करा.



