Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी’ योजनेचे थकीत ४००० रुपये दिवाळीपूर्वी जमा होणार काय? शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली

रोहन मिरजे - संस्थापक व मुख्य संपादक, सांगली टुडे (Rohan Miraje Founder Sangli Today)
By
Rohan Miraje
रोहन मिरजे - संस्थापक व मुख्य संपादक, सांगली टुडे (Rohan Miraje Founder Sangli Today)
Founder & Editor-in-Chief
रोहन मिरजे हे SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. डिजिटल पत्रकारिता, वेब मीडिया आणि डेटा-आधारित वृत्तांकनाचा त्यांना १० वर्षांहून अधिक अनुभव आहे....
- Founder & Editor-in-Chief
नमो शेतकरी योजनेचे थकीत ₹४,००० दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार का? दोन हप्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार? (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली टुडे वृत्तसेवा: राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाकडून ५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली असली, तरी दुसरीकडे हक्काच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चे हप्ते अडकल्याने बळीराजा संभ्रमात पडला आहे. या योजनेचे प्रत्येकी २ हजार रुपयांचे दोन हप्ते म्हणजेच ४ हजार रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे दुष्काळी मदतीसोबतच आमचे थकीत असलेले नमो शेतकरीचे हप्ते शासनाने तत्काळ वितरित करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये नाराजी का?

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे हप्ते वेळेत आणि नियमितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. मात्र, राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचे पैसे वेळेवर न मिळाल्याने ग्रामीण भागात नाराजी पाहायला मिळत आहे.

दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यातच खरीप पिकांची काढणी आणि रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची तातडीची गरज आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ नव्या घोषणा न करता प्रलंबित असलेले हप्ते तत्काळ खात्यात वर्ग करावेत, असा सूर शेतकरी संघटनांकडून लावला जात आहे.

हप्ते कधी जमा होणार?

सध्या शासनाकडून हे रखडलेले दोन्ही हप्ते नेमके कोणत्या तारखेला खात्यात जमा केले जातील, याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. प्रशासकीय पातळीवर निधी मंजुरी आणि तांत्रिक पडताळणीचे काम सुरू असल्याची चर्चा असली, तरी जोपर्यंत कृषी विभागाकडून अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना हप्त्याची वाट पाहावी लागणार आहे.

हे ही वाचा: पशुधन योजनेतून शेड बांधण्यासाठी खरंच ८ लाख रुपये मिळणार? सोशल मीडियावरील जाहिरातींवर शासनाचा खुलासा; पाहा सत्य.

नमो शेतकरी योजना, शेतकरी अनुदान आणि शासकीय योजनांचे अधिकृत अपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र अपडेट्स’ व्हॉट्सॲप चॅनेल नक्की फॉलो करा. 👉 चॅनेल फॉलो करा.

Share This Article
रोहन मिरजे - संस्थापक व मुख्य संपादक, सांगली टुडे (Rohan Miraje Founder Sangli Today)
Founder & Editor-in-Chief
Follow:
रोहन मिरजे हे SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. डिजिटल पत्रकारिता, वेब मीडिया आणि डेटा-आधारित वृत्तांकनाचा त्यांना १० वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचे अधिकृत निर्णय (GR), केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना, कृषी धोरणे, कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) बाजारभाव, हवामान अंदाज आणि शेतीविषयक घडामोडींचे सखोल विश्लेषण करतात.सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या शासकीय दाव्यांची सत्यता तपासणे, योजनांमधील क्लिष्ट तांत्रिक अटी सामान्य जनतेसाठी सोप्या भाषेत मांडणे आणि ग्रामीण भागातील शेतकरी, महिला व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणे हे त्यांच्या संपादकीय कार्याचे मुख्य केंद्रस्थान आहे. Sangli Today वर प्रसिद्ध होणारी प्रत्येक बातमी अधिकृत शासन राजपत्र, संबंधित मंत्रालये, कृषी विभाग आणि अधिकृत स्रोतांच्या आधारे आमच्या Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय, आर्थिक व सामाजिक घडामोडींचे निष्पक्ष आणि विश्वासार्ह वार्तांकन करणे हे त्यांचे ध्येय आहे. Published by Rohan Miraje – Policy, Agriculture, Agri-Commodity Prices & Governance Analysis on Sangli Today. संपर्क आणि पारदर्शकता: • पद: संस्थापक व मुख्य संपादक (Sangli Today) • संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 • ईमेल: hellosanglitoday@gmail.com