Sangli Crime: पलूसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जबरदस्ती विवाह आणि जातीवाचक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Palus Minor Girl Crime

Sangli Crime News | पलूस : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जबरदस्ती विवाह आणि जातीवाचक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीत संशयितांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिचा जबरदस्ती विवाह लावण्यात आला आणि त्यानंतर वारंवार शारीरिक शोषण करण्यात आले. याशिवाय पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचेही नमूद आहे.

या प्रकरणात राजू सुरेश लोहार, माधुरी सुरेश लोहार, गणेश सुरेश लोहार (सर्व रा. किर्लोस्करवाडी, ता. पलूस) आणि शैला (रा. निढळ, जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: मिरजेत तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला, प्रकृती चिंताजनक.

TAGGED:
Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा