सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.
मागील काही दिवसांपासून अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. भाजपकडून अध्यक्षपदावर दावा केला जात असतानाच अखेर महाविकास आघाडीने विजय मिळवला.
निवडणुकीत भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि महाविकास आघाडीच्या संगीता पाटील यांच्यात थेट लढत झाली. तर काही उमेदवारांनी माघार घेतल्याने सामना अधिक रंगतदार झाला होता.
या निकालामागे आमदार जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या रणनीतीची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे. या निकालामुळे सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.
हेही वाचा: उमदी जवळ ओव्हरटेक करताना बुलेटची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी.
- सांगलीत मत्स्य व्यवसायासाठी मोठी योजना; मिळणार आर्थिक मदत, उत्पन्न वाढणार?
- Sangli Zp President: जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष तर ऋषिकेश लाड उपाध्यक्ष
- उमदी जवळ ओव्हरटेक करताना बुलेटची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगलीत टपाल जीवन विमा पुन्हा चर्चेत; कमी प्रीमियममध्ये 50 लाखांपर्यंत संरक्षण
- सांगलीत मिळणार 25 वर्षे मोफत वीज? सरकारची नवीन सोलर योजना; किती अनुदान, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
- मिरजेत स्वीकृत नगरसेवक पदावरून चर्चा; बाळासाहेब अस्वले यांना संधी द्यावी अशी मागणी









