Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; एका तोळ्यामागे साडेतीन हजार रुपये स्वस्त, पाहा आजचा सोन्याचा दर, १६ ऑक्टोबर २०२६

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सलग पाचव्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; १६ ऑक्टोबरचे आजचे दर पाहा. (प्रातिनिधिक छायाचित्र)

Gold Rate Today 16 October 2026: सोने आणि चांदीच्या बाजारात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये शुक्रवारी सलग पाचव्या दिवशीही मोठी घसरण नोंदवली गेली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, गेल्या पाच दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ३ हजार ४८८ रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीही प्रति किलो १२ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

२४ आणि २२ कॅरेटचा आजचा सोन्याचा दर १६ ऑक्टोबर २०२६

शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४५ हजार ९४२ रुपयांवर आला. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४५ हजार ३५८ रुपये नोंदवला गेला. १८ कॅरेट सोने १ लाख ९ हजार ४५७ रुपये प्रति १० ग्रॅम, तर १४ कॅरेट सोन्याचा दर ८५ हजार ३७६ रुपयांवर स्थिरावला आहे.

चांदीतही मोठी घसरण; सोन्यापाठोपाठ चांदीच्या भावातही मोठी पडझड झाली आहे. आज सकाळी १ किलो चांदीचा दर २ लाख ८ हजार २७५ रुपयांवर खाली आला आहे. अवघ्या पाच दिवसांत चांदी १२ हजार ८३४ रुपयांनी घसरला आहे.

शहराचे नावआजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई₹1,45,942
पुणे₹1,45,942
नागपूर₹1,45,942
कोल्हापूर₹1,45,942
छत्रपती संभाजीनगर₹1,45,942
जळगाव₹1,45,942
सांगली₹1,45,942
बारामती₹1,45,942
रत्नागिरी₹1,45,942

हेही वाचा: २१ वर्षे पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना लाभ कधीपासून? ६५ वर्षांवरील महिलांचे काय होणार? वाचा नियमातील पेच.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा