शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय. (Ai प्रातिनिधिक छायाचित्र)

​मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा) : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये राज्यातील तब्बल ३ लाख ५१ हजार १९२ पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून तातडीने जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

​या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत राहिलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे, तसेच पुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. यासाठी बँक अधिकाऱ्यांनी पोर्टलवर तब्बल ३१.१७ लाख थकबाकीदार कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, त्यापैकी २४.६७ लाख लाभार्थ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

​तिसऱ्या यादीमध्ये विभागनिहाय, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक २ लाख ६ हजार ४५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्याखालोखाल अमरावती विभागातील ८५ हजार ७६, नागपूर विभागातील ३० हजार ७३८, नाशिक विभागातील १४ हजार २४४, पुणे विभागातील ११ हजार ९२८ आणि कोकण विभागातील २ हजार ७५६ शेतकरी या यादीत पात्र ठरले आहेत.

​सध्या या तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांची गावनिहाय यादी संबंधित बँका, विविध कार्यकारी विकास सेवा सोसायट्या आणि ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांची कर्ज थकबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार पकडली जाणार असून, १ एप्रिल २०२६ नंतरचे पुढील सर्व व्याज व इतर बँकिंग खर्च शासन स्वतः सोसणार आहे. काही शेतकऱ्यांची मूळ थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या विशेष धोरणानुसार त्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करून खाते निरंक केले जाईल.

​विशेष म्हणजे, योजनेमध्ये मयत झालेल्या, अत्यंत वयस्कर किंवा ज्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने आधीच विशेष नियमावली (SOP) जाहीर केली आहे, जेणेकरून कोणत्याही खऱ्या लाभार्थ्याला यापासून वंचित राहावे लागणार नाही. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होताच कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा होणार असल्याने, सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; पैसे उकळणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा