कवठेमहांकाळ / सांगली : सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आरेवाडी येथे दरवर्षी होणाऱ्या पारंपारिक दसरा मेळाव्याची तारीख आणि वेळेचे नियोजन अधिकृतपणे जाहीर करण्यात आल आहे. श्री बिरोबा बन येथे होणाऱ्या या मेळाव्याच्या पूर्वतयारीसंदर्भात श्री बिरोबा देवस्थान ट्रस्ट आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली.
१८ ऑक्टोबर रोजी आयोजन
यंदाचा दसरा मेळावा रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्री बिरोबा बन, आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीस देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, आ. गोपीचंद पडळकर आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
दसरा मेळाव्याची तारीख वेळ:
- तारीख: रविवार, १८ ऑक्टोबर २०२६
- वेळ: सायंकाळी ४:०० वाजता
- स्थळ: श्री बिरोबा बन, आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली)
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
आरेवाडी येथील दसरा मेळावा हा धनगर समाज आणि बहुजन बांधवांसाठी श्रद्धेचा व परंपरेचा मोठा सोहळा मानला जातो. या मेळाव्यासाठी सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून भाविक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. यंदाही या मेळाव्यास नागरिकांनी पिवळा फेटा बांधून आणि भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आणि स्थानिक पातळीवर नियोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यात २१ ऑक्टोबरपर्यंत डॉल्बी, बीम लाईट्सवर बंदी; नियम मोडल्यास होणार कारवाई.




