सांगली / नाशिक : ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकाभिमुख कारभाराच्या जोरावर सांगली जिल्हा परिषदेने राज्यपातळीवर मोठी झेप घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबवण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
नाशिक येथे आयोजित एका भव्य शासकीय कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेला प्रदान करण्यात आला.
कारभाराची राज्यस्तरावर दखल
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, डिजिटल प्रशासन आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या कामांना मोठी गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या लोकाभिमुख उपक्रमांची थेट राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. ग्रामविकासातील कामगिरी आणि मूल्यांकनाच्या आधारावर राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदांच्या यादीत सांगलीने हे मानाचे स्थान मिळवले.
जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव
या पुरस्कारामुळे सांगली जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध स्तरांतून जिल्हा परिषद प्रशासनाचे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचे कौतुक केले जात आहे.
हेही वाचा: सांगलीकरांनो लक्ष द्या! जिल्ह्यात दुचाकींसाठी ‘ही’ नवी मालिका सुरू; पसंतीचा नंबर कसा मिळवाल?.




