MPSC आंदोलनातील ‘त्या’ धनंजयने जिंकले डॉ. विश्वजीत कदमांचे मन; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाले, “ना प्रसिद्धीची हाव, ना…”

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
पुण्यातील MPSC आंदोलनस्थळी आमदार डॉ. विश्वजीत कदम.

सांगली / पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन राज्यभरात चर्चेत आहे. अनेक नेते आणि आमदारांनी या आंदोलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली. मात्र, या आंदोलनात शांतपणे, कोणतीही प्रसिद्धी न मागता सेवा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगलीचे काँग्रेस आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे मन जिंकले आहे. डॉ. कदम यांनी ‘धनंजय’ नावाच्या या विद्यार्थ्याच्या योगदानाबद्दल सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट लिहीत त्याचे मनापासून कौतुक केले आहे.

“रामसेतूतील खारीच्या वाट्यासारख काम!”

डॉ. विश्वजीत कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल आहे की, “माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक आंदोलन आणि मोर्चे अनुभवले. पण एमपीएससी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने एक वेगळाच अनुभव दिला. विवेकानंद पाटील, ऋषिकेश गांगुर्डे यांच्यासारख्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवताना खूप काही शिकायला मिळाल. मात्र, या सगळ्या चर्चेत प्रसिद्धीच्या झोतात न आलेला एक चेहरा माझ्या मनात कायमचे घर करून गेला, तो म्हणजे धनंजय!“

तहानलेल्या आंदोलकांना अविरत पाणी वाटप

गेल्या दहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. डॉ. कदम यांनी नमूद केल की, “धनंजय कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आंदोलनस्थळी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि इतरांना पाणी पोहोचवण्याच काम अविरतपणे करत आहे. ना स्वतःचे नाव व्हावे म्हणून धडपड, ना कुणी कौतुक करावे अशी अपेक्षा! तहानलेल्या माणसाला पाणी मिळावे एवढ्याच भावनेने तो आपल काम करत राहिला.”

“प्रत्येकाला मोठ काम करता येईलच असे नाही; पण आपल्या क्षमतेनुसार दुसऱ्याच्या संघर्षात हातभार लावता येतो, हे धनंजयने दाखवून दिल. रामसेतू बांधताना खारीने दिलेल्या छोट्या योगदानासारखेच हे कार्य आहे,” अशा शब्दांत डॉ. कदम यांनी धनंजय आणि त्याच्यावर संस्कार करणाऱ्या आई-वडिलांचा गौरव केला.

हेही वाचा: सांगलीकरांनो लक्ष द्या! जिल्ह्यात दुचाकींसाठी ‘ही’ नवी मालिका सुरू; पसंतीचा नंबर कसा मिळवाल?.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा