सांगली टुडे वृत्तसेवा: दिवाळी जवळ आल्याने सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढत असतानाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दसऱ्यानंतर सुरू झालेली सोन्या-चांदीच्या दरातील घसरण आजही कायम असून मौल्यवान धातूंच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. आज शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्रातील प्रमुख सराफ पेढ्यांमध्ये २२ कॅरेट व २४ कॅरेट सोन्याचे दर कमी झाल्याने ऐन सणासुदीत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बुलियन मार्केटमधील आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर सुमारे १,४२,२२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३०,३६८ रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरातही नरमाई दिसून येत असून चांदीचा प्रति किलो दर १,९३,९६० रुपये इतका नोंदवला गेला आहे. मुंबई, पुणे, सांगली आणि नाशिकच्या सराफ बाजारातही आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
प्रमुख नामांकित सराफ पेढ्यांनी आज सकाळी जाहीर केलेले प्रति ग्रॅम दर खालीलप्रमाणे आहेत:
पीएनजी ज्वेलर्स (PNG Jewellers) चे आजचे दर (प्रति ग्रॅम):
- २२ कॅरेट : ₹ १३,१८४
- २४ कॅरेट (९९९ शुद्ध): ₹ १४,३३०
- २४ कॅरेट (९९५): ₹ १४,३००
- १८ कॅरेट: ₹ ११,१०६
- चांदी (प्रति ग्रॅम): ₹ २०२ (चांदी नाणे: ₹ २०५)
चंदूकाका सराफ (Chandukaka Saraf) चे आजचे दर (प्रति ग्रॅम):
- २२ कॅरेट : ₹ १३,१०९
- २४ कॅरेट : ₹ १४,१४५
- १८ कॅरेट: ₹ १०,८३०
- चांदी (प्रति किलो): ₹ १,९८,०००
- प्लॅटिनम-९५०: ₹ ६,७५०
मलबार गोल्ड अँड डायमंड्स (Malabar Gold) चे आजचे दर (प्रति ग्रॅम):
- २२ कॅरेट (९१६ हॉलमार्क): ₹ १३,०६०
- २४ कॅरेट (९९९ शुद्ध): ₹ १४,२४७
प्रमुख शहरांमधील १० ग्रॅम सोन्याचे सरासरी भाव:
| शहर | २२ कॅरेट (१० ग्रॅम) | २४ कॅरेट (१० ग्रॅम) |
| सांगली / पुणे | ₹ १,३०,१३० | ₹ १,४१,९६० |
| मुंबई | ₹ १,३०,१३० | ₹ १,४१,९६० |
| नागपूर | ₹ १,३०,१३० | ₹ १,४१,९६० |
| नाशिक | ₹ १,३०,१३० | ₹ १,४१,९६० |
(टीप: वरील दरांमध्ये जीएसटी, कर आणि घडणावळ शुल्क (मेकिंग चार्जेस) यांचा समावेश नाही. दागिने खरेदी करताना दुकानानुसार अंतिम बिलामध्ये मेकिंग चार्जेस जोडले जातात. त्यामुळे खरेदीपूर्वी आपल्या जवळच्या स्थानिक सराफ पेढीशी संपर्क साधून अंतिम दाराची खात्री करून घ्यावी.)



