शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ‘या’ प्रमुख पिकांच्या हमीभावात मोठी वाढ; राज्यात ९५० हून अधिक खरेदी केंद्रे सुरू होणार

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सोयाबीन, तूर आणि उडदाच्या हमीभावात वाढ; राज्यात ९५० हून अधिक खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन. (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई/सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): चालू खरीप हंगामात अस्मानी संकटांमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग उत्पादक शेतकऱ्यांना किमान खर्चावर आधारित योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाने हमीभाव खरेदीची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांचा माल वेळेत आणि विनाअडथळा खरेदी व्हावा यासाठी राज्यात ९५० हून अधिक हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रशासनाला दिले आहेत. गोदामांमध्ये धान्य साठवण्यासाठी १५ लाख २८ हजार मेट्रिक टन क्षमतेची व्यवस्था करण्यात येत आहे.

यंदाच्या हंगामात केंद्र सरकारने प्रमुख पिकांच्या हमीभावात काही प्रमाणात वाढ केली आहे. यामध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे ३८० रुपयांची वाढ होऊन नवा दर ५ हजार ७०८ रुपये प्रति क्विंटल ठरवण्यात आला आहे. तसेच तुरीच्या भावात ४५० रुपयांची वाढ करून दर ८ हजार ४५० रुपये, तर उडदाच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन नवा भाव ८ हजार २०० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. 

कागदावर दर वाढले तरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रांवर वेळेवर बारदाना न मिळणे, लांबलचक रांगा आणि खरेदी उशिरा सुरू होणे अशा अडचणी दरवर्षी शेतकऱ्यांच्या वाट्याला येतात. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा खरेदी केंद्रांवर पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृहे, बारदाना आणि वाहतुकीची चोख सोय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी क्यूआर कोड टॅगिंगसारखी पारदर्शक पद्धत वापरली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता घोषणांनंतर प्रत्यक्ष खरेदी केंद्रे किती वेगाने सुरू होतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर पैसे कधी पडतात, याकडेच बळीराजाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा निर्णय लांबणीवर; रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस, सरकारी योजनांच्या नावांत बदल; पहा कॅबिनेटचे मोठे निर्णय.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा