CM Devendra Fadnavis : 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सांगलीत अहिल्यादेवींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित)

सांगली : प्रभाग क्रमांक 9 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक आता अधिक भव्य रूपात दिसणार आहे. महापालिकेतर्फे सुमारे दीड कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या 21 फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगू सरगर यांनी दिली.

मंगळवारी आयोजित समितीच्या बैठकीत कार्यक्रमाचे प्राथमिक नियोजन करण्यात आले. भाजप नेत्या जयश्री पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, रोहिणी पाटील, सचिव दत्तात्रय ठोंबरे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

देशातील असा एकमेव अश्वारूढ पुतळा

महापालिकेच्या माध्यमातून साकारलेला हा पुतळा देशातल्या अश्वारूढ स्वरूपातील अहिल्यादेवींचा एकमेव पुतळा असल्याचा दावा समितीने केला आहे.

उंची : 21 फूट

वजन : सुमारे चार टन

स्थापत्य खर्च : दीड कोटी रुपये


समिती–महापालिका समन्वय अंतिम तयारी

लोकार्पण सोहळा सर्वपक्षीय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार–खासदार उपस्थित राहणार आहेत. समितीचे प्रतिनिधीमंडळ बुधवारी आयुक्त सत्यम गांधी यांच्यासोबत बैठक घेणार असून कार्यक्रमाच्या सर्व तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

हेही वाचा: स्वस्तात सोने देण्याचे आमिष; तरुणाची पावणेआठ लाखांची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा