सांगली : विश्रामबाग परिसरातील गव्हर्न्मेंट कॉलनीत राहणाऱ्या एका वकिलाच्या घरात घुसून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप असून याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲड. उमेश श्रीकांत सहस्रबुद्धे (वय ५३) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक शंकर निकम-पाटील (६४, रा. शामरावनगर), भालचंद्र शंकर निकम-पाटील (६२, रा. खणभाग), गोरखनाथ शंकर निकम-पाटील (६०) व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेमक काय घडल?
फिर्यादीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संशयित चौघे सहस्रबुद्धे यांच्या घरासमोर आले. त्यांनी त्यांना घराबाहेर बोलावून घेत ‘आमच्या दाव्यात तुमचे वकीलपत्र नको आहे, तातडीने एनओसी द्या’ अशी मागणी केली.
यानंतर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू झाली. वाद वाढताच सहस्रबुद्धे घरात गेले ‘एनओसी देतो, बाहेर थांबा’ असे त्यांनी सांगितले. मात्र संशयित त्यांच्या मागोमाग जबरदस्तीने घरात शिरले.
सहस्रबुद्धे यांनी फाईलवर सही करून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले असता पुन्हा शिवीगाळ करत ‘तुला दाखवतोच’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










