सांगली टुडे वृत्तसेवा: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC Bank) निवडणुकीला अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या राजकीय तडजोडींमुळे २१ पैकी १७ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. उर्वरित चार जागांवर मात्र एकमत न झाल्याने प्रत्यक्ष मतदान होणार असून, यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जागावाटपाचे सूत्र कसे ठरले?
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विविध पक्षांमध्ये जागावाटप निश्चित करण्यात आले आहे:
- राष्ट्रवादी काँग्रेस: ७ जागा
- काँग्रेस: ६ जागा
- भारतीय जनता पार्टी (भाजप): ४ जागा
- शिवसेना (शिंदे गट): ३ जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): १ जागा
या चार सोसायटी गटांत होणार थेट निवडणूक:
१७ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित चार तालुक्यांच्या सोसायटी गटांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे:
- जत सोसायटी गट: या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत जतमध्ये रंगणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मार्ग मोकळा झाल्यानंतर मैदानात उतरलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर विनोद पवार यांचे थेट आव्हान असणार आहे.
- कवठेमहांकाळ सोसायटी गट: या गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि टी. व्ही. पाटील यांच्यात थेट मुकाबला रंगणार आहे.
- तासगाव सोसायटी गट: तासगावमध्ये माजी आमदार सुमनताई आर. आर. पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात राजकीय सामना रंगणार आहे.
- मिरज सोसायटी गट: मिरज सोसायटी गटातही तडजोड न झाल्याने निवडणूक अटळ ठरली आहे.
बिनविरोध विजयी झालेल्या १७ उमेदवारांची संपूर्ण यादी:
राजकीय तोडग्यानंतर खालील १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत:
- डॉ. विश्वजीत कदम
- अमोल बाबर
- महेंद्र लाड
- देवराज पाटील
- विराज नाईक
- तानाजी पाटील
- राहुल महाडिक
- पृथ्वीराज पाटील
- सतीश देशमुख
- रणधीर नाईक
- के. डी. कांबळे
- वैभव विलासराव शिंदे
- पूजा विशाल पाटील
- वर्षा विक्रम सावंत
- अर्पणा संग्राम देशमुख
- संभाजी कचरे
- नितीन होणराव



