नेत्यांचे बनावट चेहरे अन् सरकारी योजनांचा सापळा! सावधान, एका चुकीमुळे रिकाम होऊ शकत बँक खात; शासनाचा इशारा

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
नेत्यांचे बनावट व्हिडिओ आणि सरकारी योजनांच्या नावाखाली फसवणुकीचा सापळा! एका चुकीमुळे बँक खाते रिकामे होऊ शकते; शासनाच्या इशाऱ्याबाबत जाणून घ्या. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली टुडे वृत्तसेवा: सोशल मीडिया स्क्रोल करताना तुम्हाला अचानक पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचा एखादा फोटो किंवा व्हिडिओ दिसतो, ज्यात “या योजनेतून प्रत्येकाला ५,००० रुपये रोख मिळणार, खालील लिंकवर लगेच क्लिक करा” असा आकर्षित करणारा दावा केलेला असतो. हा व्हिडिओ पाहून सामान्य माणूस क्षणार्धात विश्वास ठेवतो; पण प्रत्यक्षात हा नेत्यांचा खरा व्हिडिओ नसून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा (Deepfake) वापर करून सायबर भामट्यांनी रचलेला बनावट सापळा असतो. सध्या राज्यात विविध सरकारी योजनांच्या नावाखाली अशा प्रकारे सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या असून, या गंभीर प्रकारावर खुद्द महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (MahaDGIPR) अधिकृत इशारा जारी केला आहे.

सायबर भामट्यांची ही कार्यपद्धती पाहिली तर कोणीही थक्क होईल. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर बड्या राजकीय नेत्यांचे हुबेहूब चेहरे आणि आवाज तयार करून बनावट योजनांच्या जाहिराती फिरवल्या जातात. नागरिक जेव्हा या आमिषाला बळी पडून लिंकवर क्लिक करतो, तेव्हा त्याला थेट व्हॉट्सॲपवर नेले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रक्रियेत काही नागरिकांना +९२ (पाकिस्तान) या आंतरराष्ट्रीय कोडवरून संपर्क साधून सरकारी अधिकारी असल्याचा बनाव केला जात असल्याचे शासनाने उघड केले आहे.

पुढे जाऊन या योजनेचे पैसे तातडीने बँक खात्यात हवे असतील तर आधी ६५० रुपये किंवा विशिष्ट प्रक्रिया शुल्क भरावे लागेल, असे सांगून एक क्यूआर कोड किंवा यूपीआय लिंक पाठवली जाते. पैसे मिळण्याच्या नादात नागरिक स्वतःचा यूपीआय पिन टाकतो आणि त्याच क्षणी त्याच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी असलेले सगळे पैसे भामट्यांच्या खात्यात वर्ग होतात.

शासनाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही अधिकृत सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी शासन कधीही नागरिकांकडून एक रुपयाचेही प्रक्रिया शुल्क किंवा व्हेरिफिकेशन फी मागत नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी कधीही यूपीआय पिन टाकण्याची किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नसते; पिन केवळ स्वतःच्या खात्यातून पैसे दुसऱ्याला पाठवण्यासाठीच लागतो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर आर्थिक व्यवहार करू नये. सरकारी योजनानबाबत केवळ अधिकृत संकेतस्थळांवरूनच खात्री करावी.

जर दुर्दैवाने तुमच्या सोबत असा प्रकार घडलाच किंवा तुमच्या बँक खात्यातून फसवणुकीने पैसे कापले गेले, तर घाबरून न जाता वेळ न दवडता तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर कॉल करा. त्यासोबतच राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर (cybercrime.gov.in) ऑनलाईन तक्रार नोंदवून ठेवावी. सणासुदीच्या दिवसांत अशा फसव्या मेसेजचा सुळसुळाट वाढला असल्याने नागरिकांनी स्वतः सावध राहून आपल्या घरातील इतरांनाही यापासून दूर ठेवण गरजेच आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana September पैसे कधी जमा होणार? दसरा उलटला तरी हप्ता का रखडला; पाहा सविस्तर वस्तुस्थिती.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा