Sangli News: सांगली जिल्हा बँक निवडणूक: ६ जागांसाठी विक्रमी ९३.९१% मतदान; ३ नोव्हेंबरला निकाल!

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्हा बँकेच्या ६ जागांसाठी विक्रमी मतदान! निकाल ३ नोव्हेंबरला.

सांगली टुडे वृत्तसेवा: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC Bank) संचालक मंडळाच्या उर्वरित ६ जागांसाठी रविवारी अत्यंत चुरशीने विक्रमी ९३.९१ टक्के मतदान पार पडले. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर एकूण २,४४६ मतदारांपैकी बहुतांश मतदारांनी हक्क बजावल्याने रिंगणातील १३ उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.

प्रतिष्ठेच्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

२१ पैकी १५ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागांवर अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती पाहायला मिळाल्या:

  • जत सोसायटी गट: भाजप आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध काँग्रेसचे विनोद पवार.
  • तासगाव गट: माजी खासदार संजयकाका पाटील विरुद्ध माजी आमदार सुमनताई पाटील (आमदार रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला).
  • कवठेमहांकाळ गट: माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील.
  • मिरज गट: अण्णासाहेब कोरे विरुद्ध भाजपचे अनिल शेगुणशे.

जतमध्ये गोपनीयतेवरून अर्धा तास तणाव

जत मतदान केंद्रावर मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आक्षेप घेतला. यामुळे सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. मात्र, प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. इतर सर्व केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले.

हेही वाचा: Sangli DCC Bank Election: सांगली जिल्हा बँक मतदानादरम्यान मोठा राडा! उघड मतदानाचा आरोप करत माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक; फेरमतदानाची मागणी.

मंगळवारी (३ नोव्हेंबर) मतमोजणी

या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सांगली मार्केट यार्डातील शेतकरी भवनात होणार आहे. चुरशीचे मतदान पाहता जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार, याचा फैसला आता मंगळवारीच स्पष्ट होईल.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा