सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली यांच्याकडून लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून एकूण 20 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेच्या कार्यक्षेत्रात सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
लिपिक पदाच्या या भरतीसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून MS-CIT किंवा समतुल्य संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असून बँकिंग किंवा सहकारी क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच JAIIB, CAIIB किंवा इतर मान्यताप्राप्त बँकिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना अतिरिक्त गुण मिळणार आहेत.
उमेदवारांचे वयोमर्यादा 21 ते 35 वर्षे इतकी असून, ऑनलाईन परीक्षेचे शुल्क 875 रुपये अधिक GST व बँक शुल्क असेल. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून General Knowledge, Aptitude, Reasoning, Mathematics, Marathi व English Grammar, Computer Literacy आणि Banking या विषयांचा समावेश असणार आहे. परीक्षा 100 गुणांची असून कालावधी 90 मिनिटांचा राहणार आहे.
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली असून 25 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी तसेच परीक्षाशुल्क भरण्यासाठी https://sznsbal.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगली महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू; नेतृत्वासमोर उमेदवार निवडीचे आव्हान.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









