सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : सांगलीतील कृष्णा नदीत कारखान्यांकडून मळी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी केला आहे. या रासायनिक विषारी पाण्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत झाल्याचा दावा करण्यात आला असून शहरातील सुमारे पाच लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना पवार म्हणाले की, काही कारखानदारांकडून सातत्याने मळी व केमिकलयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. गेल्या एका वर्षात किमान सात वेळा अशा प्रकारे नदी प्रदूषित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मार्च 2024 मध्ये नदी प्रदूषणाच्या विरोधात सांगलीकर आणि पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी आंदोलनही केले होते. त्यानंतर राज्य शासनाने या प्रश्नाची दखल घेतली होती.

दरम्यान, नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे 94 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 6 ते 12 महिने लागू शकतात. तोपर्यंत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर राहणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

कृष्णा नदीत रासायनिक पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.

तसेच नदी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास गुढी पाडव्याच्या दिवशी महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

येथे वाचा: सांगली नागरिक प्रश्न बातम्या.

हेही वाचा: कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा