सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Census 2027 House Listing Starts May 16

सांगली : भारताची जनगणना 2027 प्रक्रिया 16 मे 2026 पासून सुरू होत असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना करण्यात येणार आहे. ही कार्यवाही 14 जून 2026 पर्यंत चालणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी दिली.

जनगणनेचा पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ असा असून नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात 21 चार्ज स्तरांवर 4 हजार 421 प्रगणक आणि 791 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 23 एप्रिल ते 8 मेदरम्यान त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक गावागावात जाऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. यावेळी घराची स्थिती, कुटुंबातील सदस्य, उपलब्ध सुविधा, मालमत्ता आणि इतर माहितीबाबत एकूण 34 प्रश्न विचारले जाणार आहेत.

ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने HLO ॲपद्वारे पार पडणार असून नागरिकांच्या माहितीची गोपनीयता सुरक्षित ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा