सांगली : कवठेमहांकाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी रिक्त जागांवर विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाने केले आहे.
जत रोडवरील मेघराज टेकडी येथे हे वसतिगृह असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ते चालवले जाते. इयत्ता 8 वी ते 10 वी, 11 वी-12 वी तसेच बीए, बीकॉम, बीएस्सी आणि विविध व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे मोफत प्रवेश दिला जातो.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी 9527217728, 9763515188, 9823059773 किंवा 7058996397 या क्रमांकांवर संपर्क साधावा तसेच वसतिगृहास प्रत्यक्ष भेट द्यावी.
हेही वाचा: बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी.




