Sangli News: सांगली एसटीचा मोठा दिलासा; दिवाळीसाठी धावणार ८० जादा बसेस; पुण्यासाठी ३ वातानुकूलित ई-बस, पाहा वेळापत्रक

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
दिवाळीसाठी सांगली एसटीच्या ८० जादा बसेस; पुण्यासाठी ३ ई-बसेसही सुरू!

सांगली: दिवाळी सणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, सांगली एसटी विभागाने विशेष नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १० आगारांतून सुमारे ८० जादा बसेस सोडण्यात येत असून, ही सुविधा आज, २ नोव्हेंबरपासून २२ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध राहील. गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एकट्या भाऊबीजेच्या दिवशी सुमारे ५० जादा बसेस रस्त्यावर उतरवण्यात येणार आहेत.

ऐन सणासुदीत पुणे, मुंबईसह मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. यासाठी सांगली मध्यवर्ती बसस्थानकातून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि अमरावतीसाठी २० जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, शिराळा, आटपाडी, विटा आणि ईश्वरपूर या सर्व तालुका आगारांमधून प्रवाशांच्या सोयीनुसार जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि बारामती मार्गावरही जादा फेऱ्या धावणार आहेत.

पुण्यासाठी कऱ्हाड-सातारा बायपासने धावणार ३ ई-बसेस 

स्वारगेट (पुणे) मार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून सांगली आगारातून १ नोव्हेंबरपासून तीन वातानुकूलित ई-बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्या कऱ्हाड व सातारा शहरात न जाता थेट बायपास मार्गाने धावणार आहेत. सांगलीतून या बसेस सुटण्याच्या वेळा सकाळी ९:३०, दुपारी २:३० आणि दुपारी ३:३० अशा निश्चित करण्यात आल्या असून, स्वारगेट येथे पोहोचल्यानंतर या बसेस लगेच सांगलीसाठी परतीच्या प्रवासाला निघतील. प्रवाशांची गर्दी पाहून गरजेनुसार बसेसच्या संख्येत आणखी वाढ करण्यात येणार आहे.

हेही वाचा: महागाईमुळे धनत्रयोदशीला सोन खरेदी परवडत नाही? मग ‘या’ ३ स्वस्त वस्तू आणा घरी; घरात नांदेल लक्ष्मी, पाहा काय खरेदी करू नये.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा