सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय कामकाजाला गती देण्याचे संकेत दिले असून प्रलंबित विकास प्रस्ताव व नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सर्व खातेप्रमुखांची विस्तृत बैठक घेतली.
कै. राजाभाऊ जगदाळे सभागृहात झालेल्या या बैठकीत उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेते संदीप आवटी तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक विभागाकडून सध्याच्या कामकाजाची स्थिती, प्रलंबित फाईली आणि शासन स्तरावर अडकलेले प्रस्ताव याची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
महापौर सूर्यवंशी यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत, “नागरिकांच्या दैनंदिन अडचणींशी संबंधित कामांना प्राधान्य द्यावे. कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहू नये,” असे सांगितले. घरपट्टी, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मूलभूत नागरी सुविधा याबाबत स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विकास प्रस्तावांना गती देण्यासाठी संबंधित मंत्र्यांमार्फत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. आगामी पाच ते सहा दिवसांत विभागनिहाय विशेष आढावा बैठका घेण्यात येणार आहेत.
महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त करत, नव्या नेतृत्वाने शहर विकासाला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयांमुळे प्रलंबित कामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत









