सांगली : कमी प्रीमियममध्ये जास्त संरक्षण देणारी टपाल जीवन विमा (PLI) योजना पुन्हा चर्चेत आली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत ५० लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळत असून अनेक नागरिकांसाठी हा एक स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय आहे.
१८८४ पासून सुरू असलेली ही देशातील सर्वात जुनी जीवन विमा योजना आहे. सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, व्यावसायिक तसेच पदवीधर नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
PLI अंतर्गत संपूर्ण जीवन विमा, मुदतीचा विमा, युगल सुरक्षा आणि बाल विमा अशा विविध पॉलिसी उपलब्ध आहेत. कमी प्रीमियम, जास्त बोनस आणि आयकर सवलत ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
तसेच या योजनेत कर्ज सुविधा आणि सोपी प्रीमियम भरण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. नागरिकांना पोस्ट ऑफिस, बँकिंग सेवा किंवा ऑनलाइन पद्धतीनेही प्रीमियम भरता येतो.
इच्छुक नागरिक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन किंवा https://www.indiapost.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
हेही वाचा: सांगलीत मिळणार 25 वर्षे मोफत वीज? सरकारची नवीन सोलर योजना; किती अनुदान, अर्ज कसा करायचा जाणून घ्या.
- सांगलीत टपाल जीवन विमा पुन्हा चर्चेत; कमी प्रीमियममध्ये 50 लाखांपर्यंत संरक्षण
- सांगलीत मिळणार 25 वर्षे मोफत वीज? सरकारची नवीन सोलर योजना; किती अनुदान, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
- मिरजेत स्वीकृत नगरसेवक पदावरून चर्चा; बाळासाहेब अस्वले यांना संधी द्यावी अशी मागणी
- Sangli Breaking: सांगली जिल्ह्यात ३० मार्चपर्यंत जमावबंदी; ५ पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई
- सांगली मनपाचा १०६५ कोटींचा अर्थसंकल्प; पाणी, स्वच्छता, लाईट व पर्यावरणासाठी मोठी तरतूद
- Miraj News : ‘गुरुजी’ म्हणाले गुप्तधन काढतो, मुलाला बरा करतो… मिरजेत महिलेची ३.२२ लाखांची फसवणूक









