सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचा २०२६-२७ साठी १०६५.२४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून यात थेट नागरिकांशी संबंधित पाणीपुरवठा, स्वच्छता, लाईट आणि पर्यावरण यासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे.
सांगलीच्या या अर्थसंकल्पात शहरातील मूलभूत सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी २३.८५ कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापनासाठी ४०.०५ कोटी रुपये तर शहरातील दिवाबत्ती व्यवस्थेसाठी ४१.१० कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे.
अर्थसंकल्पात पर्यावरणाच्या दृष्टीनेही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कृष्णा नदी प्रदूषणमुक्ती, सरोवर पुनरुज्जीवन यांसाठी ३३.६४ कोटी तर एलईडी पथदिवे, ई-बस आणि सौर प्रकल्पांसाठी ५७.६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, मनपाच्या उत्पन्नात जीएसटी अनुदान आणि मालमत्ता कराचा मोठा वाटा असून एकूण ४३३.५७ कोटी महसूल अपेक्षित आहे. वाढत्या शहराच्या गरजांनुसार कर्मचारी व सेवांसाठी २३२.३२ कोटींचा खर्चही प्रस्तावित करण्यात आला आहे.
हेही वाचा: ‘गुरुजी’ म्हणाले गुप्तधन काढतो, मुलाला बरा करतो… मिरजेत महिलेची ३.२२ लाखांची फसवणूक.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










