सांगली : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने १७ मार्च ते ३० मार्चदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून या काळात सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशानुसार नागरिकांना शस्त्रे, काठ्या किंवा इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच दगडफेक, स्फोटक पदार्थ, घोषणा देणे, गाणी किंवा वाद्य वाजवणे यांसारख्या कृतींनाही मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे फलक, चिन्हे किंवा प्रदर्शन करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतेही मोर्चे, सभा किंवा जमाव परवानगीशिवाय घेता येणार नाहीत.
दरम्यान, शासकीय कामकाज, धार्मिक विधी, अंत्यविधी आणि परीक्षा यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हा आदेश जारी केला असून ३० मार्चपर्यंत हा आदेश लागू राहणार आहेत.
हेही वाचा: सांगली मनपाचा १०६५ कोटींचा अर्थसंकल्प; पाणी, स्वच्छता, लाईट व पर्यावरणासाठी मोठी तरतूद.
- मिरजेत स्वीकृत नगरसेवक पदावरून चर्चा; बाळासाहेब अस्वले यांना संधी द्यावी अशी मागणी
- Sangli Breaking: सांगली जिल्ह्यात ३० मार्चपर्यंत जमावबंदी; ५ पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई
- सांगली मनपाचा १०६५ कोटींचा अर्थसंकल्प; पाणी, स्वच्छता, लाईट व पर्यावरणासाठी मोठी तरतूद
- Miraj News : ‘गुरुजी’ म्हणाले गुप्तधन काढतो, मुलाला बरा करतो… मिरजेत महिलेची ३.२२ लाखांची फसवणूक
- Sangli Accident : कृष्णा व्हॅली शाळेसमोर ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
- आटपाडीच्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर रिलीज; सुबोध भावे यांच्या आवाजामुळे वाढली उत्सुकता









