सांगली : शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या तक्रारी आणि काही प्रभागांतील डास प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी विशेष बैठक घेऊन विभागाकडून सध्याची नेमकी स्थिती जाणून घेतली.
शहरात आतापर्यंत किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले? डॉग पाउंडमध्ये पुरेसे डॉक्टर उपलब्ध आहेत का? मोकाट कुत्री पकडण्यासाठी किती पथके प्रत्यक्ष कार्यरत आहेत? याबाबत तपशील मागविण्यात आला.
डास नियंत्रणासाठी सुरू असलेल्या मोहिमेत वापरात असलेले १८ ट्रॅक्टर व फॉगिंग मशिन्स नेमके कोणत्या प्रभागांत कार्यरत आहेत, याची पडताळणी करण्यात आली. काही भागांत फवारणी अपुरी असल्याच्या तक्रारींचाही उल्लेख बैठकीत झाला.
प्रभागनिहाय स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष कामकाजाची स्थिती यावरही चर्चा झाली. ज्या भागांत मनुष्यबळ अपुरे असल्याचे निदर्शनास आले, तेथे अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: सांगलीत 26 फेब्रुवारीला तृतीयपंथीयांसाठी विशेष रोजगार मेळावा; शासकीय योजनांबाबत थेट मार्गदर्शन.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









