सांगली : जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून तब्बल 900 महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
या प्रशिक्षणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 62 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये बचत गटातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.
ग्रामीण भागातील 500 महिलांसाठी 90 लाख रुपये, 250 महिलांसाठी 45 लाख रुपये आणि इतर प्रशिक्षणासाठी 27 लाख रुपये असा निधी वितरित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणामध्ये महिलांना विविध व्यवसायांची माहिती, कर्ज योजना, आर्थिक व्यवस्थापन आणि मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मेकअप, बुटिक, फॅशन ज्वेलरी, कॅटरिंग, दुग्धजन्य पदार्थ, हस्तकला, अगरबत्ती उत्पादन अशा विविध उद्योगांचे प्रशिक्षण मिळणार.
या उपक्रमामुळे सांगली जिल्ह्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग खुला होणार आहे.
हेही वाचा: सांगलीत महिला रोजगार मेळावा; 300+ नोकऱ्या, फक्त 2 दिवस बाकी.
- सांगलीत महिलांसाठी मोठी संधी; 900 महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, 1.62 कोटींचा निधी
- सांगलीत महिला रोजगार मेळावा; 300+ नोकऱ्या, फक्त 2 दिवस बाकी
- आटपाडी : निंबवडे येथे चरित्र्याच्या संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीची हत्या; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
- सांगलीत विवाहासाठी 20 हजारांची मदत; कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या
- सांगलीच्या ७ महिलांनी मिळवला दिल्लीत सन्मान; राष्ट्रीय मंचावर झळकली कामगिरी
- सांगलीत कंबरेला कोयता लावून फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल










