सांगली: राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत वाळव्याच्या ‘मोरया’ गणेश मंडळाची बाजी; विटा, खरसुंडीच्या मंडळांचाही गौरव

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत येडेनिपाणीच्या मोरया गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. विटा आणि खरसुंडी येथील मंडळांचाही जिल्हास्तरावर गौरव. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली (सांगली टुडे विशेष प्रतिनिधी): राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सांगली जिल्ह्याने वर्चस्व निर्माण केले आहे. वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील ‘मोरया सार्वजनिक गणेश मंडळा’ने संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच जिल्हास्तरावर विटा आणि खरसुंडी येथील मंडळांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. शासनाने गुरुवारी (१५ ऑक्टोबर) या स्पर्धेचा अधिकृत निकाल जाहीर केला.

शासनाकडून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत असून पर्यावरणपूरक मूर्ती, सामाजिक उपक्रम, शिस्त आणि देखाव्यांच्या मूल्यांकनावर ही स्पर्धा पार पडली. १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर छाननी करून एकूण १४१ मंडळांची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विजेती मंडळे:

  • राज्य व जिल्हा पातळीवर प्रथम: मोरया गणेश मंडळ (येडेनिपाणी, ता. वाळवा)
  • जिल्हा पातळीवर द्वितीय: तिरंगा गणेशोत्सव मंडळ (विटा, ता. खानापूर)
  • जिल्हा पातळीवर तृतीय: नाथ युवा असोसिएशन (खरसुंडी, ता. आटपाडी)

आज मुंबईत गौरव सोहळा: या स्पर्धेतील सर्व मानकरी मंडळांना आज शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मान्यवरांच्या हस्ते अधिकृतपणे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील गणेश मंडळाने राज्यपातळीवर अव्वल क्रमांक पटकावल्याने वाळवा परिसरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून मंडळाचे कौतुक होत आहे.

वाचा: सांगली: यंदा दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन कृष्णा नदीत नाही; मिरजेतील गणेश तलावात विसर्जन करण्याचा निर्णय, मंडळांची सहमती.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा