Sangli Politics : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी वेगात; इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
Sangli Municipal Corporation elections (Congress Logo)

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची घोषणा या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता असताना काँग्रेसने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. भाजपकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता काँग्रेसनेही प्रभागनिहाय इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याचे काम सुरु केले आहे.

सध्या शहर-जिल्हाध्यक्ष पद रिक्त असल्याने पक्ष निरीक्षक अमर खानापुरे यांनी पक्षातर्फे प्रभागनिहाय इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज थेट जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महापालिका निवडणुका ताकदीने लढवण्याचा पक्षाचा निर्धार असून, सांगली जिल्ह्यात आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून, स्थानिक पातळीवर इच्छुकांची चाचपणी करून सक्षम उमेदवार मैदानात उतरवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

हेही वाचा: अवैध गौण खनिज माती वाहतुकीवर महसूल विभागाची कडक कारवाई; दोन ट्रॅक्टर व जेसीबी जप्त.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा