Sangli Today | जत : जत तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारात आढळून आलेल्या युवकाच्या निर्घृण खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून या खुनामागील कारण स्पष्ट केले असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मयत युवकाचे नाव विकास मलकारी टकले (वय २२, रा. उमदी, ता. जत) असे आहे. या प्रकरणी रविंद्र आबासाहेब बंडगर (वय ३०) आणि विराज संजय पांढरे (वय २०) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस तपासानुसार, दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या कारणावरून आरोपी आणि विकास टकले यांच्यात वाद झाला होता. याच वादातून दोघांनी विकासला जनावर बाजार परिसरात नेले. तेथे लाकडी दांडक्याने आणि दगडाने त्याच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या गोपनीय माहितीस एकत्रितपणे तपासण्यात आले. त्यानंतर संशयितांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे.
हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामागे अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा; संशयित ताब्यात, मुद्देमाल जप्त.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










