Gold Price Prediction 2036: येत्या दशकात सोन्याचा भाव कुठे पोहोचेल? जुन्या आकडेवारीवर आधारित गणित काय सांगतय, वाचा सविस्तर

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
पुढील १० वर्षांत सोन्याचा भाव १० ग्रॅममागे ८ लाखांवर जाऊ शकतो का? २०१६ ते २०२६ च्या आकडेवारीवर आधारित गणित जाणून घ्या. (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली टुडे आर्थिक विशेष: गेल्या काही वर्षांत सोन्याच्या भावात झालेली विक्रमी वाढ पाहून सध्या सर्वसामान्यांपासून ते सराफा बाजारातील व्यापाऱ्यांपर्यंत एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे—‘आज लाखाच्या घरात गेलेल सोन पुढील १० वर्षांत नेमक कुठे पोहोचेल?’

हा प्रश्न केवळ मोठ्या गुंतवणूकदारांचा किंवा शेअर बाजारातील लोकांचा नाही, तर मुला-मुलींच्या लग्नासाठी आधीपासून तोळा-तोळा सोन जोडून ठेवणाऱ्या पालकांसाठी आणि सुरक्षित ठेव म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे.

भविष्यात सोन्याचा भाव किती असेल, याचा अचूक अंदाज आज कोणीही वर्तवू शकत नाही. मात्र, २०१६ ते २०२६ या मागील एका दशकातील वाढीचा कल (CAGR/Growth Rate) पाहिला, तर चक्रवाढ वाढीच्या ताकदीने पुढील दशकात (२०३६ पर्यंत) काय घडू शकत, याच एक गणित समोर येत.

मागील १० वर्षांत सोन्याने कसा घेतला वेग?

२०१६ मध्ये २४ कॅरेट सोन्याचा सरासरी दर प्रति १० ग्रॅम साधारण ₹२८,६२३ होता. आज २०२६ मध्ये तो ₹१,५२,६७० च्या आसपास पोहोचला आहे. या १० वर्षांच्या प्रवासाकडे पाहिल तर एक बाब स्पष्ट होते—सोन्याची तेजी दरवर्षी सारखी नसते.

वर्ष२४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम अंदाजे)वार्षिक वाढ (%)
२०१६₹२८,६२३—
२०१७₹२९,६६७३.६५%
२०१८₹३१,४३८५.९७%
२०१९₹३५,२२०१२.०३%
२०२०₹४८,६५१ (कोरोना काळ)३८.१३%
२०२१₹४८,७२००.१४%
२०२२₹५२,६७०८.११%
२०२३₹६५,३३०२४.०४%
२०२४₹७७,९१३१९.२६%
२०२५₹१,०३,८७०३३.३२%
२०२६₹१,५२,६७०४६.९८%

२०१७ किंवा २०२१ सारख्या वर्षांत बाजारात फारशी हालचाल नव्हती; मात्र कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक महागाई यांसारख्या संकटांच्या काळात सोन्याने ३०% ते ४५% पर्यंत उसळी घेतली.

हेच वाढीचे प्रमाण पुढे कायम राहिले तर? (२०२७ ते २०३६ चे गणित)

जर मागील दशकातील वार्षिक वाढीची टक्केवारी जशीच्या तशी पुढील १० वर्षांवर लागू केली, तर चक्रवाढ सूत्रानुसार (Compound Growth) पुढील वर्षांचे संभाव्य आकडे असे दिसतात:

  • २०२७: ₹१,५८,२३८ (३.६५% वाढ गृहीत धरून)
  • २०२८: ₹१,६७,६८२ (५.९७% वाढ)
  • २०२९: ₹१,८७,८५४ (१२.०३% वाढ)
  • २०३०: ₹२,५९,४९१ (३८.१३% वाढ)
  • २०३१: ₹२,५९,८५९ (०.१४% वाढ)
  • २०३२: ₹२,८०,९२८ (८.११% वाढ)
  • २०३३: ₹३,४८,४५३ (२४.०४% वाढ)
  • २०३४: ₹४,१५,५६७ (१९.२६% वाढ)
  • २०३५: ₹५,५४,०१४ (३३.३२% वाढ)
  • २०३६: ₹८,१४,३०० (४६.९८% वाढ)

(टीप: हे केवळ मागील आकडेवारीवर आधारित गणितीय मॉडेल आहे; ही कोणतीही अधिकृत घोषणा किंवा भविष्य वर्तवणे नाही.)

खरोखरच सोन ८ लाखांवर जाईल का?

गणितानुसार १० ग्रॅमसाठी ₹८.१४ लाख हा आकडा निघत असला, तरी प्रत्यक्षात बाजार असा सरळ रेषेत चालत नाही. मागील दशकात जगभरात घडलेल्या घडामोडींमुळे सोन्याला मोठी तेजी मिळाली होती. पुढील १० वर्षांतील जागतिक परिस्थिती कशी राहते, यावरच अंतिम भाव ठरेल. त्यामुळे ₹८ लाखांचा आकडा ही भविष्यवाणी नसून ‘चक्रवाढ व्याजाची ताकद’ दाखवणारे एक समीकरण आहे.

सोन्याची दिशा ठरवणारे मुख्य ५ घटक:

  1. मध्यवर्ती बँकांची खरेदी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह जगभरातील मध्यवर्ती बँकांनी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वेगाने वाढवला आहे.
  2. महागाई आणि चलनाचा दर: रुपयाचे अवमूल्यन झाले किंवा महागाई वाढली की चलनाचे मूल्य टिकवण्यासाठी लोक सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य देतात.
  3. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण: अमेरिकेत व्याजदर कमी झाले की सोन्यात तेजी येते, तर व्याजदर वाढल्यास बाजारात काही काळ स्थिरता किंवा मंदी दिसते.
  4. लग्नसराई व सण: भारत आणि चीन हे सोन्याचे सर्वात मोठे ग्राहक आहेत. सणासुदीची आणि लग्नसराईची मागणी भारतीय सराफा बाजाराला भक्कम आधार देते.
  5. जागतिक युद्ध व भू-राजकीय तणाव: आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध, निर्बंध किंवा राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे पैसा वळतो.

ग्राहकांसाठी काय महत्त्वाचे? 

सोन्यात एका रात्रीत श्रीमंत होण्याची अपेक्षा न ठेवता दीर्घकालीन बचतीचे साधन म्हणून पाहणे अधिक फायद्याचे ठरते. ₹८ लाखांचे गणित हे आकडेमोडीपुरते रंजक असले, तरी प्रत्यक्ष खरेदी किंवा गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम आणि स्वतःच्या आर्थिक गरजांचा विचार करूनच निर्णय घेणे योग्य ठरेल.

(अस्वीकरण: वरील माहिती केवळ ऐतिहासिक आकडेवारीच्या विश्लेषणासाठी दिली आहे. हा कोणताही गुंतवणूक सल्ला नाही. सोन्याच्या दरात चढ-उतार होत असतात; कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा: Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; खरेदीपूर्वी पाहा सांगली, पुण्यासह PNG चे आजचे दर (२७ ऑक्टोबर २०२६).

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा