“शेतकऱ्याला ₹५,००० ची भीक नको, ठोस मदत द्या!” दुष्काळी मदतीवरून खासदार विशाल पाटील यांचा राज्य सरकारवर घणाघात

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या ₹५,००० च्या मदतीवरून खासदार विशाल पाटील यांचा राज्य सरकारवर निशाणा! (फोटो: सोशल मीडिया)

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीवरून सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “शेतकऱ्याला ५ हजार रुपयांची भीक नको, तर त्याच्या घामाला योग्य दाम, हमीभाव आणि कर्जमाफी हवी,” असा घणाघात करत त्यांनी सरकारचे हे धोरण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याचा आरोप केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली. यावर थेट आक्षेप घेत खासदार विशाल पाटील म्हणाले की, शेतकरी बांधवांनी वर्षभर रक्ताचे पाणी करून, लाखो रुपयांचे भांडवल लावून पिके उभी केली आहेत. सध्या तीव्र दुष्काळाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातावर अवघे ५ हजार रुपये टेकवून दिवाळी साजरी करायला सांगणाऱ्या सरकारला लाज वाटली पाहिजे. ही मदत नसून केवळ जखमेवर केलेली तात्पुरती मलमपट्टी आहे, अशी टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या कष्टांची किंमत अवघ्या पाच हजारांत मोजून सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत खासदार पाटील म्हणाले की, आज बळीराजाला खरी गरज पीकविम्याची पूर्ण भरपाई, संपूर्ण कर्जमाफी आणि संकटाच्या काळात मोठ्या आर्थिक पॅकेजची आहे. मात्र शासन या मूलभूत मागण्यांवर केवळ वेळकाढूपणा करत आहे. ५ हजार रुपयांच्या या तुटपुंज्या मदतीत शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होणे अशक्य असून, या निर्णयावरून सरकारचे शेतकरीविरोधी धोरण पुन्हा एकदा उघडे पडले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा निर्णय लांबणीवर; रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस, सरकारी योजनांच्या नावांत बदल; पहा कॅबिनेटचे मोठे निर्णय.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा