सांगली टुडे वृत्तसेवा: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. योजनेच्या रखडलेल्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण राज्य शासनाकडून अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात (DBT) द्वारे जमा होणारे १,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होत असल्याने सणासुदीच्या खरेदीसाठी महिला वर्गाला आर्थिक हातभार लागणार आहे.
शेवटी हे पाहायला विसरू नका: 👉 या वाढत्या महागाईत १५ ते २५ हजारात मिळतंय ब्रँडेड मंगळसूत्र; दिवाळी खरेदीसाठी पाहा ७ सुंदर डिझाईन्स अन् भाव.
सामाजिक न्याय विभागाकडून ३४४.६२ कोटींचा विशेष निधी वर्ग
सप्टेंबर महिन्यातील हप्ता लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ३४४.६२ कोटी रुपयांचा विशेष निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. प्रशासकीय पातळीवर आवश्यक असणारी सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि निधीची तरतूद पूर्ण होताच, आता थेट बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्याचे काम टप्प्याटप्प्याने वेगाने पूर्ण केले जात आहे.
१,५०० जमा होणार की ३,००० रुपये? संभ्रम मिटला
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन्ही महिन्यांचे मिळून एकदम ३,००० रुपये खात्यात जमा होणार का, याबाबत लाभार्थी महिलांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, सध्या महिला व बालविकास विभागाकडून केवळ सप्टेंबर महिन्याचा नियमित १,५०० रुपयांचा हप्ता वितरीत केला जात असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी (e-KYC) नंतर १ कोटी ६६ लाख महिला पात्र
योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि केवळ गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ई-केवायसी पडताळणी प्रक्रियेमुळे लाभार्थी संख्येत काही प्रमाणात फेरबदल झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या १ कोटी ६६ लाख पात्र लाभार्थी महिला या योजनेचा नियमित लाभ घेत आहेत. ज्या महिलांनी आपले बँक खाते आधारशी लिंक केले आहे आणि ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली आहे, त्यांच्याच खात्यात हे पैसे त्वरित जमा होत आहेत.
तुमच्या बँक खात्यात हप्ता आला का? अस तपासा
१. तुमच्या बँकेशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरील मेसेज (SMS) तपासा.
२. बँकेचे अधिकृत मोबाईल ॲप किंवा नेटबँकिंग ओपन करून जमा झालेली रक्कम पाहा.
३. जवळच्या बँक शाखेत जाऊन मिनी स्टेटमेंट घ्या किंवा पासबुक प्रिंट करून खात्री करा.
लाडकी बहीण योजना व ईतर नवीन योजनांचे लेटेस्ट अपडेट्स मोबाईलवर
लाडकी बहीण योजना व ईतर नवीन शासकीय योजनांचे अधिकृत शासन निर्णय, फॅक्ट-चेक आणि शेतकरी योजनांबद्दल ताजी माहिती मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र अपडेट्स’ व्हॉट्सॲप चॅनेल फॉलो करायला विसरू नका. 👉 चेनेल फॉलो करा.
हेही वाचा: १ नोव्हेंबरपासून स्टेट बँकेतून पैसे काढता येणार नाहीत? ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी!.



