सांगली टुडे वृत्तसेवा: दिवाळीचा सण आता अगदी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून येत्या ६ नोव्हेंबर रोजी राज्यभरात धनत्रयोदशी (Dhanteras) मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर घरात धन, समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची पूर्वापार परंपरा आहे. मात्र, सध्या सराफ बाजारात सोन्या-चांदीचे भाव (Gold Price) प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे दिवाळीचे बजेट कोलमडले आहे.
- १. नवीन झाडू (लक्ष्मी आणि स्वच्छतेचे प्रतीक)
- २. अख्खे धणे (समृद्धी आणि भरभराटीचे बीज)
- ३. तांब्या-पितळेचे लहान भांडे किंवा चांदीचे नाणे
- सावधान! धनत्रयोदशीला चुकूनही खरेदी करू नका ‘या’ गोष्टी
- संध्याकाळी ‘यमदीपदान’ करायला विसरू नका
- धनत्रयोदशी २०२६: शुभ मुहूर्त आणि पूजा वेळ
- धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचे महत्त्व:
सोन्याचे दर पाहून यंदा धनत्रयोदशीला सोन खरेदी कस कराव, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर चिंता करण्याची अजिबात गरज नाही. शास्त्र आणि जुन्या परंपरेनुसार, धनत्रयोदशीला केवळ सोनेच खरेदी केले पाहिजे असे नाही; फक्त १० ते ५० रुपयांत मिळणाऱ्या अशा ३ अत्यंत साध्या गोष्टी आहेत, ज्या घरी आणल्या तरी प्रत्यक्ष लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे. त्याचबरोबर या दिवशी नकळत कोणत्या वस्तू खरेदी केल्याने नुकसान होऊ शकते, हेही समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
१. नवीन झाडू (लक्ष्मी आणि स्वच्छतेचे प्रतीक)
आपल्या संस्कृतीत झाडूला प्रत्यक्ष देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू विकत घेऊन घरी आणणे अत्यंत फलदायी मानले जाते. घराची स्वच्छता करणाऱ्या झाडूमुळे घरातील नकारात्मकता, दारिद्र्य आणि रोगराई दूर होते अशी श्रद्धा आहे. दिवाळीच्या खरेदीत १०-२० तोळे सोन्यापेक्षा श्रद्धेने आणलेला एक नवा झाडू घराचे भाग्य उजळवण्यासाठी पुरेसा मानला जातो.
२. अख्खे धणे (समृद्धी आणि भरभराटीचे बीज)
धनत्रयोदशीला बाजारातून अख्खे धणे खरेदी करण्याची अतिशय जुनी परंपरा आहे. केवळ १०-२० रुपयांत बाजारात मिळणारे धणे धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या चरणी अर्पण करून पूजेनंतर यातील काही दाणे घरातील तिजोरीत किंवा पैशांच्या पाकिटात ठेवावेत, व उरलेले दाणे अंगणात किंवा कुंडीत पेरावेत. हे धणे जसजसे उगवतात, तसतशी घरात सुख-समृद्धी वाढते असा विश्वास आहे.
३. तांब्या-पितळेचे लहान भांडे किंवा चांदीचे नाणे
जर सोन्याचे दागिने घेणे आवाक्याबाहेर असेल, तर घरात तांब किंवा पितळेच एखाद लहान भांड, ताट किंवा दिवा खरेदी करावा. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते; त्यामुळे या दिवशी तांब्या-पितळेचे नवीन भांडे घेणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय शक्य असल्यास कमी बजेटमध्ये एक लहान चांदीचे नाणे किंवा पूजेसाठी चांदीचा चमचाही खरेदी करणे शुभ मानले जाते.
सावधान! धनत्रयोदशीला चुकूनही खरेदी करू नका ‘या’ गोष्टी
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर काही गोष्टींची खरेदी करणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो
- लोखंडाच्या वस्तू: धनत्रयोदशीला लोखंडाची वस्तू किंवा लोखंडी अवजारे खरेदी करणे टाळावे.
- काचेच्या वस्तू: काचेचा संबंध राहू ग्रहाशी मानला जातो, त्यामुळे या शुभदिनी काचेचे सामान घरी आणणे टाळतात.
- धारदार साहित्य: चाकू, कात्री, सुरी किंवा इतर टोकदार वस्तू या दिवशी अजिबात खरेदी करू नयेत.
- उधारीचे व्यवहार: या दिवशी कोणाकडून उसने पैसे घेणे अथवा कोणाला उसने पैसे देणे टाळावे; यामुळे धनाची बरकत राहत नाही असे मानले जाते.
संध्याकाळी ‘यमदीपदान’ करायला विसरू नका
धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ नवीन वस्तू खरेदी करून चालत नाही, तर संध्याकाळी प्रदोष काळात घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दक्षिणेकडे तोंड करून मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला जातो. याला ‘यमदीपदान’ म्हणतात. कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी हे यमदीपदान केले जाते.
धनत्रयोदशी २०२६: शुभ मुहूर्त आणि पूजा वेळ
| प्रसंग / विधी | शुभ वेळ व तारीख |
| धनत्रयोदशी तारीख | शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ |
| त्रयोदशी तिथी प्रारंभ | ६ नोव्हेंबर २०२६, सकाळी १०:३० वाजता |
| त्रयोदशी तिथी समाप्ती | ७ नोव्हेंबर २०२६, सकाळी १०:४७ वाजता |
| धनत्रयोदशी पूजा मुहूर्त | संध्याकाळी ०६:०२ ते रात्री ०७:५७ पर्यंत |
| प्रदोष काळ | संध्याकाळी ०५:३३ ते रात्री ०८:०९ पर्यंत |
| वृषभ काळ (स्थिर लग्न) | संध्याकाळी ०६:०२ ते रात्री ०७:५७ पर्यंत |
| यमदीपदान | ६ नोव्हेंबर २०२६, संध्याकाळी |
धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचे महत्त्व:
हिंदू परंपरेत धनत्रयोदशी हा केवळ एक सण नसून समृद्धी आणि नव्या सुरुवातीचा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी करणे (Gold Purchase On Dhantrayodashi) म्हणजे घरात थेट माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवाचा वास होणे, अशी लोकमान्यता आहे. सोने हा निसर्गतः शुद्ध, टिकाऊ आणि मौल्यवान धातू असल्याने तो नकारात्मकता दूर करून जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि पावित्र्य आणतो, अशी श्रद्धा आहे.
धार्मिक परंपरेसोबतच यामागे एक भक्कम व्यावहारिक आणि आर्थिक कारणही आहे. जुन्या काळापासून सोने हे आर्थिक सुरक्षिततेचे आणि संकटकालीन मदतीचे सर्वोत्तम साधन मानले गेले आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर सोन्याचे नाणे किंवा दागिना खरेदी करणे म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून कुटुंबाच्या भविष्यातील भरभराटीसाठी केलेली एक सुरक्षित गुंतवणूक ठरते.
हेही वाचा: लाडक्या बहिणींच्या खात्यात अखेर ₹१,५०० जमा होण्यास सुरुवात; तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत कि नाही तपासा.
अस्वीकरण (Disclaimer): “या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यता, पंचांग आणि लोकपरंपरेवर आधारित असून ती केवळ सामान्य माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘सांगली टुडे’ या माहितीची, किंवा कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही. कोणताही आर्थिक किंवा खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी स्वतःच्या विवेकाचा वापर करावा.”



