Sangli DCC Bank Election: सांगली जिल्हा बँक मतदानादरम्यान मोठा राडा! उघड मतदानाचा आरोप करत माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक; फेरमतदानाची मागणी

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk

सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sangli DCC Bank) २०२६-२०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत सोसायटी गटात मतदानादरम्यान मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. जतमधील मतदान केंद्रावर लोकशाहीचा उघडपणे अवमान केला जात असून ‘अ’ गटातील मतदारांकडून उघडपणे दाखवून मतदान केले जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी केला आहे. याप्रकरणी जतमधील मतदान प्रक्रिया तातडीने रद्द करून तिथे पुन्हा पारदर्शक पद्धतीने फेरमतदान घ्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

“लोकशाहीला काळीमा फासला जातोय”: विक्रम सावंत

जत येथील मतदान केंद्राबाहेर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार विक्रम सावंत यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. सावंत म्हणाले की, “सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज सकाळपासून सुरू आहे. जत येथे लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शक वातावरणात मतदान होणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या माध्यमातून त्याला काळीमा फासला जातोय हे चित्र आहे. ‘अ’ गटातील अनेक जणांनी उघडपणे दाखवून मतदान केले आहे. हा लोकशाही प्रक्रियेचा गंभीर अवमान असून मतदान प्रक्रियेवर कुठेतरी दबाव आणि हस्तक्षेप होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.”

या संपूर्ण प्रकाराविरोधात निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगत, जत येथील मतदान प्रक्रिया रद्द करून ती पुन्हा पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने घेण्यात यावी, यासाठी लढा देणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: महागाईमुळे धनत्रयोदशीला सोन खरेदी परवडत नाही? मग ‘या’ ३ स्वस्त वस्तू आणा घरी; घरात नांदेल लक्ष्मी, पाहा काय खरेदी करू नये.

“पराभव दिसत असल्यानेच विरोधकांचा गोंधळ”: आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया

विक्रम सावंत यांच्या आरोपांवर भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पडळकर म्हणाले की, “जत सोसायटी गटातील सर्व ८८ मतदारांनी शांततेत आणि लोकशाही मार्गाने मतदानाचा हक्क बजावला आहे. आपला पराभव समोर स्पष्ट दिसत असल्यानेच विरोधक निवडणूक अधिकारी आणि केंद्र प्रमुखांशी वाद घालून प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांवर दबाव आणण्याचे काम विरोधकांचेच असून, मतदार आमच्या पाठीशी ठाम आहेत आणि आमचा विजय निश्चित आहे.”

जिल्ह्यातील ६ जागांसाठी चुरशीने मतदान

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण २१ जागांपैकी १५ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ६ जागांसाठी आज जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर २ हजार ४४६ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीत जत सोसायटी गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आघाडीचे विनोद पवार यांच्यात हायव्होल्टेज लढत होत आहे. तर तासगावमध्ये माजी खासदार संजय पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन पाटील, आणि कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील अशी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. कडक पोलिस बंदोबस्त असतानाच जतमधील या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

हेही वाचा: पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीचे भाव स्थिर! PNG आणि चंदुकाका सराफमधील २२K, २४K चे आजचे सोन्याचे दर (१ नोव्हेंबर २०२६).

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा