Sangli Police CCTNS First Rank | सांगली : संगणकीकृत गुन्हे नोंदणी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network & Systems) प्रकल्पाच्या कामगिरीत सांगली जिल्हा पोलिसांनी राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय आढाव्यात सांगली पोलिसांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला.
या यशाबद्दल जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि शिस्तबद्ध कामगिरीचे कौतुक करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभात अधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला. संगली पोलिसांनी गुन्हे नोंदणी, तपास, तसेच डिजिटल साधनांच्या योग्य वापरामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: दसरा-दिवाळी निमित्त मिरजेतून धावणार चार विशेष रेल्वे.