जत : वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव समोर आल्याने जत तालुक्यातील हिप्परकर टोळीतील पाच जणांना सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडिपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत.
तडिपार करण्यात आलेल्यांमध्ये रोहित विष्णू हिप्परकर (21), सार्थक तानाजी हिप्परकर (24), अक्षय ऊर्फ खंडू बाबासाहेब हिप्परकर (22) आणि मंगेश ऊर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर (28, सर्व रा. सिंगनहळ्ळी, ता. जत) यांचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधितांवर २०२४ आणि २०२५ या कालावधीत अपहरण व खंडणी, घातक शस्त्रांनी मारहाण, जिवे मारण्याची धमकी, जबरीने मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जत पोलिस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये तडिपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनी चौकशी करून अहवाल दिल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या आदेशानुसार संबंधितांना पुढील दोन वर्षे सांगली व सोलापूर जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










