Sangli Development News | सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, दर्जेदार रस्ते आणि सर्व आवश्यक नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जयश्री पाटील, शेखर इनामदार, समित कदम, पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत शहराचा विकास अधिक वेगाने व्हावा, यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे.
हेही वाचा: चंद्रकांत पाटील-जयंत पाटील यांच्यात तीव्र शब्दयुद्ध; जयंत पाटील यांचा सोशल मीडियावरून पलटवार.