शिराळ्यातील बेलदारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Beldarwadi Zp School Praveshotsav Shirala Sangli 2026

शिराळा: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बेलदारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करून शिक्षणाच्या प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.

प्रवेशोत्सवानिमित्त पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गावातून रथातून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. शाळेत आगमन झाल्यानंतर गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला बेलदारवाडी गावच्या सरपंच सौ.योगिता सुधीर बिळासकर , निवृत्त पोलिस अधीकारी श्री.विलास महादेव मस्कर, जिल्ह्यातून लेखा विभागाचे अधिकारी श्री.किशोर पुजारी साहेब. , समग्र शिक्षाकाचे तालुका समन्वयक श्री.नितीन पाटील , माजी सरपंच धर्मेंद्र शेवाळे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संदीप मस्कर ,CRP वैशाली बोंगे , पालक कुमार बोंगे , कमल विलास मस्कर ,सुषमा शेवाळे , स्वप्निल मस्कर , प्रचिती शेवाळे , नितीन जाधव , स्वप्नाली घारगे , पूर्वा बिळासकर , दिपाली जाधव , जयश्री शेवाळे , रंजना शेवाळे , उषा घारगे यांच्या बरोबर गावातील इतर ग्रामस्थ पालक , उपस्थित होते.

यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशांचे वितरण करण्यात आले. तसेच सुराज्य पाणी फाऊंडेशन, बेलदारवाडी आणि Environment Conservation Association (ECA), पुणे यांच्या सहकार्याने शाळेला वॉटर फिल्टर, दोन संगणक संच आणि डिजिटल शिक्षणासाठी प्रोजेक्टर भेट देण्यात आला.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुराज्य पाणी फाऊंडेशनतर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला आंब्याचे रोप देण्यात आले. रोपांची लागवड व संगोपन कसे करावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. तसेच शाळा परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Beldarwadi Zp School Shirala Sangli Admission 2026

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पालक आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विशेषतः पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीसाठी रथ उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांचे कौतुक करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक तानाजी कदम, राजाराम काटवटे, अंगणवाडी सेविका काजल शेवाळे तसेच मदतनीस संगीता शेवाळे यांनी केले.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा