शिराळा : तालुक्यातील रिळे गावात मक्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून गांजा सदृश्य रोपे जप्त केली असून शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रिळे येथील फुपिरे फाटा परिसरातील एका शेतात छापा टाकण्यात आला. मक्याच्या पिकामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची रोपे लावल्याचे आढळून आले.
तपासणीदरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष १७ रोपे जप्त केली. त्यांचे एकूण वजन सुमारे १.३३४ किलो असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेल्या रोपांपैकी एक नमुना रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी शेतमालक शंकर प्रकाश सपकाळ (रा. रिळे, ता. शिराळा) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिराळा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीत घरगुती गॅसचा गैरवापर सुरूच? सांगली-मिरज-जतसह ४ ठिकाणी तपासणी.
- Gold Rate Today: दिवाळी खरेदीत सोन धडाम; २२K आणि २४K चे भाव किती उतरले? पाहा पीएनजीचे आजचे ताजे दर
- FASTag Local Pass: टोल नाक्यावर रांगेत थांबण्याचा मनस्ताप संपला! ‘राजमार्गयात्रा’ ॲपवरून घरबसल्या कसा काढायचा लोकल पास? जाणून घ्या नियम
- Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सांगली, कोल्हापुरात पुन्हा वेग; कोणत्या जिल्ह्यातून किती किमी जाणार? पाहा सविस्तर आकडेवारी
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; २८ ऑक्टोबरनंतर भाव आणखी कोसळणार की तेजी येणार? खरेदीपूर्वी पाहा पीएनजीचे आजचे दर (२५ ऑक्टोबर २०२६)
- Ladki Bahin Yojana: दिवाळी सणासाठी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? खात्यात १५०० जमा होणार की ३०००? पाहा नेमकी स्थिती
- Maharashtra Weather: राज्यात धो-धो पाऊस? २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हवामानात मोठा उलटफेर; उकाड्यात पावसाची चाहूल









