सांगली : इनाम धामणी रोडवर किरकोळ वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत मुलाच्या समोरच त्याच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, संशयित हल्लेखोरांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मृत व्यक्तीचे नाव कीर्ती कुमार शेडबाळे (वय 50) असे असून, या हल्ल्यात त्यांचा मुलगा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कीर्ती कुमार शेडबाळे हे आपल्या मुलासह दुचाकीवरून इनाम धामणी परिसरातील कच्च्या रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला बसलेल्या तीन तरुणांशी त्यांचा किरकोळ वाद झाला. हा वाद काही क्षणांतच वाढत जाऊन मारहाणीमध्ये बदलला. यावेळी संशयितांनी दगडाने हल्ला करत शेडबाळे यांना गंभीर जखमी केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमका वाद कशावरून झाला आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्यास अटक.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









