डिजिटल व्यवहार करताना सतर्कता आवश्यक – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सांगलीत कार्यशाळा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेतील क्षणचित्र, सांगली

सांगली : ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा डिजिटल व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड एमआयडीसी येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, प्राचार्य आण्णासाहेब गाजी, निवृत्त न्यायाधीश ॲड. फारूक कोतवाल, ॲड. ओमकार वांगीकर, ॲड. जयंत नवले, ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आशिष फुलुके म्हणाले की, कोणतीही खरेदी करताना पावती घेणे आवश्यक आहे. फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी. ग्राहकांनी आपले हक्क ओळखून सजगपणे व्यवहार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत ॲड. ओमकार वांगीकर यांनी डिजिटल न्याय प्रणाली आणि ई-दाखिल पोर्टलद्वारे ग्राहक तक्रार कशी दाखल करता येते, याबाबत सविस्तर माहिती दिली. ऑनलाईन तक्रारीमुळे वेळ आणि खर्च वाचतो, तसेच लवकर न्याय मिळण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

ॲड. फारूक कोतवाल, सर्जेराव पाटील आणि इतर वक्त्यांनीही ग्राहकांचे अधिकार, कर्तव्ये आणि फसवणूक झाल्यास कायदेशीर प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रेमला खोत आणि दर्शनी पाटील यांनी केले, तर पुरवठा निरीक्षक राजू कदम यांनी आभार मानले.

हेही वाचा: नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा