Gold-Silver Rate Today: दिलासा; सोन्या-चांदीच्या भावात नरमाई, पाहा पीएनजी आणि चंदुकाका सराफमधील २२K व २४K चे आजचे दर (२ नोव्हेंबर २०२६)

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
धनत्रयोदशीपूर्वी दिलासा! सोन्या-चांदीचे दर घसरले; आजचे भाव पाहा. (२ नोव्हेंबर २०२६)

सांगली टुडे वृत्तसेवा: दिवाळीचा सण आता चार दिवसांवर येऊन ठेपला असून, येत्या ५ नोव्हेंबरला वसुबारस आणि ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी होणार आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढत असतानाच ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण आज, सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळच्या सत्रातही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, अमेरिकेतील आगामी निवडणुका आणि आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) दबाव कायम असला, तरी स्थानिक किरकोळ बाजारात खरेदीदारांसाठी सध्याचे दर दिलासादायक ठरत आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख सराफ पेढ्यांमधील आजचे सोन्याचे दर (२ नोव्हेंबर २०२६)

पीएनजी ज्वेलर्समधील आजचे दर (PNG Today Rates)

महाराष्ट्रातील नामांकित पीएनजी ज्वेलर्समध्ये आज (२ नोव्हेंबर) सकाळी नोंदवले गेलेले प्रति ग्रॅम धातूंचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • २४ कॅरेट सोने (९९९ शुद्धता): १३,८३० रुपये प्रति ग्रॅम (१,३८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम)
  • २४ कॅरेट सोने (९९५ शुद्धता): १३,८०० रुपये प्रति ग्रॅम (१,३८,००० रुपये प्रति १० ग्रॅम)
  • २२ कॅरेट सोने : १२,७२४ रुपये प्रति ग्रॅम (१,२७,२४० रुपये प्रति १० ग्रॅम)
  • १८ कॅरेट सोने: १०,७१८ रुपये प्रति ग्रॅम (१,०७,१८० रुपये प्रति १० ग्रॅम)
  • १४ कॅरेट सोने: ८,२९८ रुपये प्रति ग्रॅम
  • चांदी (प्रति ग्रॅम): १७९ रुपये (प्रति किलो १,७९,००० रुपये)
  • चांदीचे नाणे: १८२ रुपये प्रति ग्रॅम

चंदुकाका सराफमधील आजचे दर (Chandukaka Saraf Rates)

चंदुकाका सराफ अँड सन्सने आज सकाळी ९:१६ वाजता अपडेट केलेले अधिकृत दर खालीलप्रमाणे आहेत:

  • २४ कॅरेट सोने: १३,८५० रुपये प्रति ग्रॅम (१,३८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम)
  • २२ कॅरेट सोने: १२,८३६ रुपये प्रति ग्रॅम (१,२८,३६० रुपये प्रति १० ग्रॅम)
  • १८ कॅरेट सोने: १०,६०५ रुपये प्रति ग्रॅम (१,०६,०५० रुपये प्रति १० ग्रॅम)
  • प्लॅटिनम (९५०): ६,१९० रुपये प्रति ग्रॅम
  • चांदी: १,८४,००० रुपये प्रति किलो

हे वाचायला विसरू नका: महागाईमुळे धनत्रयोदशीला सोन खरेदी परवडत नाही? मग ‘या’ ३ स्वस्त वस्तू आणा घरी; घरात नांदेल लक्ष्मी, पाहा काय खरेदी करू नये.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील चित्र

मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे १,२६,४०० ते १,२७,३०० रुपयांच्या आसपास आहे. तर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर १,३७,९९० ते १,३८,८७० रुपयांच्या घरात आहे. मुंबईत चांदी प्रति किलो १,७९,७९२ रुपयांवर स्थिर आहे.

सणासुदीच्या खरेदीसाठी सुवर्णसंधी?

येत्या ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असल्याने अनेक नागरिक सोने-नाणी तसेच दागिन्यांची आगाऊ नोंदणी करत आहेत. सराफ बाजारातील जाणकारांच्या मते, जागतिक पातळीवर दरवाढीला तात्काळ मोठा वाव नसल्याने सध्याचे दर सणासुदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी योग्य मानले जात आहेत.

(टीप: वर नमूद केलेल्या सोन्या-चांदीच्या दरांवर स्थानिक पातळीवर जीएसटी (GST), टीसीएस आणि मेकिंग चार्जेस (घडणावळ) अतिरिक्त लागू होतात. खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी आपल्या जवळच्या अधिकृत दालनाशी संपर्क साधून अंतिम दराची खात्री करावी.)

हेही वाचा: Sangli News: सांगली एसटीचा मोठा दिलासा; दिवाळीसाठी धावणार ८० जादा बसेस; पुण्यासाठी ३ वातानुकूलित ई-बस, पाहा वेळापत्रक.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
चॅनेल फॉलो करा