सांगली : हरिपूर ते सांगली मार्गावर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत सायकलवरून घरी जाणारी ११ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास घडली.
तन्वी शरद बावधनकर (वय ११, रा. गंगानगर, हरिपूर) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील शरद वसंत बावधनकर यांनी सांगली शहर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी ही सकाळी खाजगी क्लास सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती. त्यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने तिला धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वार घटनास्थळी न थांबता मदत न करता पसार झाला. परिसरातील नागरिकांनी तन्वीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: महिलांना धमकावून साडेआठ लाखांची लूट; कवठेपिरान घरफोडी प्रकरणातील आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत









