सांगली : मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे घरात घुसून महिलांना हत्याराचा धाक दाखवत साडेआठ लाखांहून अधिक किमतीचे दागिने लुटल्याप्रकरणी आरोपी काका सरपंचा काळे (वय 27, रा. चिकुर्डे, ता. वाळवा) याला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी 10 वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीस तीन महिन्यांची अतिरिक्त साधी कैद भोगावी लागणार आहे.
आरोपीने कवठेपिरान येथील तरसुम शिफा मुजावर यांच्या घराची कडी काढून घरात प्रवेश केला. घरातील महिलांनी आरडाओरडा करू नये म्हणून हत्याराचा धाक दाखवत फिर्यादीस मारहाण करून तिजोरी उघडण्यास भाग पाडले. या घटनेत सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा सुमारे 8 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता.
सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली होती. पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी युक्तिवाद केला.
न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत 10 वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
हेही वाचा: सांगलीत नोकरीच्या आमिषाने 9 लाखांची फसवणूक; शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










