मिरज : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत मिरज येथे शुक्रवार (दि. 17 एप्रिल) रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल येथे होणार असून मिरज तहसील कार्यालय व सांगली अपर तहसील कार्यालयाच्या अधिनस्त गावांतील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ येथे मिळणार आहे.
या शिबिरात महसूल विभागासह इतर शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, अर्ज, तक्रार निवारण यांची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या शिबिरास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.






