मिरज : शहरातील शिवाजी पुतळा चौक परिसरात एका कॅफेत कोयत्याचा धाक दाखवत तरुणांकडून लूट केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ‘ब्रदर्स अड्डा’ कॅफेमध्ये चार तरुण कोयते घेऊन घुसले. त्यांनी कॅफेतील कर्मचाऱ्यांना धमकावत गल्ल्यातील पैसे देण्यास भाग पाडले.
या वेळी संशयितांनी काउंटरवर कोयता फेकून दहशत निर्माण केली तसेच “पोलीसांत तक्रार केली तर जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर त्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन पळ काढला.
या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने बंद केली.
या प्रकरणी सौरभ पोतदार, ओंकार साळुंखे, आकाश फोंडे आणि सार्थक जाधव यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: खिशातून रुमाल काढताना अपघात; वाळव्याच्या तरुणाचा मृत्यू.
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी










